रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (15:07 IST)

प्लास्टिक बाळ जन्माला आलं, अंगावर त्वचा नाही तर प्लास्टिक!

या जगात कधी काय चमत्कार घडतील, काही सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार बिहारच्या औरंगाबादच्या सदर रुग्णालय परिसरात असलेल्या नवजात शिशु देखभाल युनिटमध्ये घडला असून एका महिलेने संपूर्ण शरीर प्लास्टिकने गुंडाळलेल्या बाळाला जन्म दिला आहे. त्याचे शरीर कातडीने झाकलेले नाही तर प्लास्टिकसारख्या वस्तूने झाकलेले आहे.
 
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या बालकाला कोलोडीयन या आजाराने ग्रासले आहे. दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या या बालकाच्या हाताच्या व पायाच्या बोटांसह संपूर्ण शरीरावर प्लास्टिकसारखा थर आहे. यामुळेच या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना 'प्लास्टिक बेबी' असेही संबोधले जाते.
 
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोलोडियन हा जगातील दुर्मिळ आजारांपैकी एक आहे, जो पालकांच्या शुक्राणूंमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे होतो. दोन्ही गुणसूत्रांना संसर्ग झाल्यास जन्माला येणारे बाळ कोलोडियन असू शकते. या आजारात मुलाच्या संपूर्ण शरीरावर प्लास्टिकचा थर येतो. हळूहळू हा थर फुटू लागतो आणि असह्य वेदना होतात. संसर्ग वाढला तर त्याचा जीव वाचवणे कठीण होते. यापूर्वी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून अशाच मुलाचा जन्म झाल्याची बातमी आली होती. मुलांमध्ये, हा रोग अनुवांशिक विकारांमुळे होतो.
 
वैद्यकीय शास्त्रानुसार, हे कोलोडियन बेबी आहे जे जगात जन्मलेल्या 11 लाख बाळांपैकी एक आहे. एसएनसीयूमध्ये उपचार घेत असलेले हे बालक सध्या पूर्णपणे निरोगी असून सामान्य बालकांप्रमाणेच प्रत्येक उपक्रमही करत आहे. मात्र तो किती काळ जगू शकेल, हे सांगता येणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.