शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 2 जुलै 2017 (09:51 IST)

नोटाबंदीनंतर तीन लाखांपेक्षा अधिक कंपन्या तपास सुरु :पंतप्रधान

नोटाबंदीनंतर देशभरातील तीन लाखांपेक्षा अधिक कंपन्या तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  दिली आहे. सोबतच नोटाबंदीनंतर जमा झालेल्या पैशांची सखोल चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर पहिल्यादाच नवी दिल्लीत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात मोदी  बोलत होते.

देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार सत्तेत आल्यानंतर स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा कमी झाला आहे. २०१३ मध्ये काळ्या पैशांमध्ये ४२ टक्क्यांची वाढ झाली होती. पण २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर भारतीयांच्या स्विस बँकेतील काळ्या पैशांत ४५ टक्क्यांची घट झाली आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंटनी आपल्या ग्राहकांना त्याबद्दल जागृती करावी, असं आवाहन देशभरातील सर्व चार्टर्ड अकाऊंटंटना केलं.