गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (17:28 IST)

लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढण्यात येणार - केंद्रीय रेल्वे मंत्री

Postage stamp will be issued in memory of Lata Mangeshkar - Union Railway Ministerलता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढण्यात येणार - केंद्रीय रेल्वे मंत्री  Marathi National News  In Webdunia Marathi
ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी दीर्घ उपचारानंतर निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिली. त्यांना शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. स्वर कोकिळाच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे . खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुंबईत जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींशिवाय देश-विदेशातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित दिवंगत गायकाच्या स्मरणार्थ आता केंद्र सरकार टपाल तिकीट काढणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे. 2001 मध्ये लता दीदींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला. .
 
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोनामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या 28 दिवस रुग्णालयात उपचाराधीन होत्या. त्यांनी कोरोना आणि न्यूमोनियावर मात केली होती. परंतु शरीराचे अनेक अवयव खराब झाल्याने अखेर 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:12वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर राजकारण, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावरअंत्यसंस्कार करण्यात आले.