रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2024 (15:30 IST)

UPSC च्या नवीन अध्यक्षापदी प्रीती सुदान यांची निवड

preeti sudan
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 1983 च्या बॅचच्या IAS अधिकाऱ्याची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली. प्रीती सुदान 1 ऑगस्टपासून पदभार स्वीकारणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 2025 पर्यंत राहणार आहे. प्रीती सुदान या आंध्र प्रदेश केडरच्या 1983 च्या बॅचच्या निवृत्त IAS अधिकारी आहेत.त्या UPSC च्या सदस्या देखील आहे. त्यांनी आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयासह विविध पदांवर काम केले आहे. 

कोण आहेत प्रीती सुदान 
प्रीती सुदान या आंध्रप्रदेश कॅडरच्या निवृत्त आयएएस आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ जुलै 2020 मध्ये संपला. त्यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयातही काम केले आहे.
त्यांनी आंध्रप्रदेश मध्ये अर्थ नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन आणि कृषीच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहे. त्यांनी बँकेसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. 
 
प्रीती सुदान यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आयुष्यमान भारत सारख्या केंद्र सरकारच्या योजना सुरु करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच त्यांनी नॅशनल मेडिकल कमिशन, अलाइड हेल्थ प्रोफेशनल्स कमिशन आणि ईसिगारेट वरील बंदी शी संबंधित कायदे बनवण्यात आपले योगदान दिले आहे. 

त्यांची UPSC अध्यक्षापदासाठी निवड मनोज सोनी यांच्या जागेवर करण्यात आली असून नुकतेच मनोज सोनी यांनी आपल्या पदावरून वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता. ते 2017 मध्ये UPSC सदस्य म्हणून रुजू झाले. 2023 मध्ये त्यांची UPSC च्या अध्यक्षपदी निवड झाली.  
Edited By- Priya Dixit