1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. president election, NDA meet

एनडीए महत्वपूर्ण बैठक, राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा होणार

दिल्लीत सोमवारी एनडीए पक्षांची महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दिल्लीतल्या प्रवासी भारतीय भवन इथे संध्याकाळी साडे सहा वाजता ही बैठक होणार आहे. निमित्त यूपीच्या विजयाचं असलं तरी राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा होणार आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर म्हणजे  तीन वर्षांनी उद्धव ठाकरे मोदी-शाहांना दिल्लीत भेटतील. याआधी एनडीएचं सरकार असताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी कधी मुंबईत आले तर ते आवर्जून मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घ्यायचे. पण मोदी-शाहांच्या युगात चित्र बदलत गेलं. मोदी आणि उद्धव ठाकरेंची किमान काही सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी भेट झाली. पण उद्धव ठाकरे आणि अमित शाह हे तर तब्बल तीन वर्षांनी आमने-सामने असतील.
पुढील लेख
आर के नगरची पोटनिवडणूक रद्द