उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला, जो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला.
तसेच पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट करून त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. राजीनाम्यानंतर नवीन उपराष्ट्रपतींच्या नावावर विचारमंथन सुरू झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला. धनखड यांनी सोमवारी संध्याकाळी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले होते की, 'मी माझ्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करण्यासाठी तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.' त्यांनी आपल्या पत्रात संविधानाच्या कलम 67 (अ) चा उल्लेख केला.
Edited By- Dhanashri Naik