सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 एप्रिल 2023 (15:06 IST)

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पुजारी आणि भाविकामध्ये लाथा-बुक्के, पैसे घेऊन VIP दर्शन घेण्यावरून वाद

Omkareshwar
Omkareshwar Temple ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनादरम्यान भाविक आणि पुजारी यांच्यात लाथा-बुक्क्या झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये लाथा-बुक्के सुरू आहेत. खेदाची बाब म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडला.
 
प्रत्यक्षात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून हजारो भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तेवढ्यात अचानक पुजारी आणि भक्त यांच्यात वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली. लवकरात लवकर दर्शन घेण्यासाठी लोकांकडून पैसे घेतात, असा आरोप मंदिराच्या पुजाऱ्यावर होत असून, ज्याच्याकडून पुजाऱ्याने पैसे घेतले होते, त्या भाविकात मात्र दर्शनाबाबत असंतोष होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर या प्रकरणाचे रुपांतर हाणामारीत झाले.
 
भाविकाने पुजार्‍याकडे पैसे देऊन व्हीआयपी दर्शनाचे गोष्ट ठरविली होती. मात्र तो असमाधानी होता आणि त्याने पुजाऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर पुजाऱ्याने भक्ताला लाथ मारली आणि धक्काबुक्की केली. हा सर्व प्रकार पोलिसांसमोरच घडला. मात्र नंतर मांधाता पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला.
 
पुजाऱ्यांवर कारवाई : वृत्तानुसार मंदिर ट्रस्टने वादात अडकलेल्या दोन पुजाऱ्यांना दर्शन व्यवस्थेतून हटवून प्रसादालयात पाठवले आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांशी कोणत्याही प्रकारचा असभ्य वर्तन होऊ देऊ नये, असे सांगितले असून दर्शनाच्या नावाखाली अवैध वसुली करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.