सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 17 जानेवारी 2022 (09:26 IST)

पंतप्रधान मोदींनीच आम्हाला इमानदारीचे प्रमाणपत्र दिले- अरविंद केजरीवाल

"गोव्यातील जनता काँग्रेस-भाजपला कंटाळली आहे. गोव्यातील जनतेला बदल हवा आहे आणि या वेळी खरा बदल घडेल, असे वाटते," असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
 
गोव्यामध्ये आम आदमी पक्षाचा प्रचार करताना केजरीवालांनी हे वक्तव्य केलं. दोन दिवसाच्या गोवा दौऱ्यावर असलेले केजरीवाल हे घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. रविवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
 
या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटलं, की "निवडणूक 14 फेब्रुवारीला आहे आणि गोव्यातील मतदार खूप उत्साही आहेत. यावेळी खरा बदल होईल, असे त्यांना वाटतं. पूर्वी नागरिकांकडे पर्याय नव्हता. एकदा भाजप आणि एकदा काँग्रेस येत असल्याने जनता कंटाळली होते आणि आता त्यांना बदल हवा आहे."
 
"चांगले काम करणार, असं निवडणुकीच्या काळात सर्वच पक्ष सांगतात. पण आम्ही हे दिल्लीत करून दाखवले आहे. तिथे आम्ही प्रामाणिकपणे सरकार चालवून दाखवले आहे. 'आप' हा देशातील सर्वांत प्रामाणिक पक्ष असल्याचे इमानदारीचे प्रमाणपत्र खुद्द पंतप्रधान मोदींनीच दिले आहे", असंही केजरीवाल यांनी म्हटलं.