1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (12:44 IST)

पंतप्रधान मोदी हिटलरच: शिंदे

Prime Minister Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौर्‍याच्या पार्श्र्वभूीवर सोलापूर आणि परिसरातील काँग्रेस नेते आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. सोलापूरला आणीबाणी आणणारे मोदी हे हिटलरच आहेत, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करत शिंदे यांनी मारहाण करणार्‍या मस्तवाल पोलीस अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी यावेळी केली. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात जनआक्रोश वाढत चालल्याने विरोधकांचे तोंड बंद करण्याकरिता सरकार पोलीस अंगावर सोडते. परंतु लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कायदा हातात घेणार्‍या पोलिसांनी सत्ता येत-जात असते, याची जाणीव ठेवावी, असे शिंदे म्हणाले. सोलापूरला आणीबाणीसदृश परिस्थिती आणली गेली, हे मोदी हुकूमशाही मानसिकतेचे असल्याचे निदर्शक आहे. सीबीआय संचालकांच्या मध्यरात्री केलेल्या उचलबांगडीतून व कुणाशीही सल्लामसलत न करता जाहीर केलेल्या नोटाबंदीसारख्या निर्णयातून ते आधीच दिसून आले, असे ते म्हणाले.
 
आपल्या उद्योगपती मित्रांसाठी राफेल तथा अन्य व्यावसायिक प्रकरणात प्रधानमंत्री मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांडतांडव करत आहेत. मिशेल मामा आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्यामुळेच मोदींची बिनबुडाची आगपाखड सुरू आहे, अशा शब्दात शिंदे यांनी टीकास्त्र सोडले.