बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (12:58 IST)

पंतप्रधान मोदींनी तिरुपती बालाजींच्या चरणी पूजा केली

Prime Minister  Narendra Modi
तिरुमला येथे पंतप्रधान मोदी. पंतप्रधान मोदी आज (27 नोव्हेंबर) तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचले. तेथे त्यांनी पूजा केली. पीएम मोदींनी त्यांच्या X सोशल मीडिया हँडलवरून काही छायाचित्रेही शेअर केली आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात 140 कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.” पंतप्रधान मोदी सकाळी 8 वाजता मंदिरात पोहोचले. 
 
 पूजेदरम्यान ते पारंपारिक पोशाखात दिसले. त्यांनी धोतर नेसले असून  शाल पांघरला होता. मंदिराच्या पुजाऱ्यांनी मोदींना वैदिक आशीर्वाद दिले.
 
पीएम मोदी आज तेलंगणामध्ये दोन रोड शो करणार आहेत. हैदराबादमध्ये संध्याकाळी 5 वाजता मोदींचा रोड शो होणार आहे. त्याचवेळी ते करीमनगरमध्ये सभेला संबोधित करणार आहेत. तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.  3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
 
भगवान व्यंकटेश्वराची पूजा केल्यानंतर पीएम मोदी दुपारी 12:45 वाजता मुरादनगरमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील. दुपारी 2:45 वाजता करीमनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. सायंकाळी 5 वाजता हैदराबादमध्ये रोड शो करणार. साडेसात वाजता अमीरपत गुरुद्वाराला जातील. रात्री 8 वाजता हैदराबाद येथे कोटी दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होतील.

Edited by -Priya Dixit