शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (12:43 IST)

प्रत्येकवेळी फक्त कलाकारांनाच का टार्गेट केल जात ? प्रियंकाचा सवाल

भारत आणि पाकिस्तानमधल्या संबंधांवरुन प्रत्येकवेळी फक्त कलाकारांनाच टार्गेट का केल जात, असा सवाल अभिनेत्री प्रियंका चोप्राने उपस्थित केला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रियंका चोप्राने हे मत व्यक्त केल आहे. 
 
यावेळी प्रियांका म्हणाली, नेहमी, कलाकार, अभिनेत्यांना याप्रकरणात ओढले जाते. आमच्यासोबतच असे का होते? अभिनेतांच्या व्यतिरिक्त व्यापारी, डॉक्टर तसेच राजकारण्यासोबत का होत नाही?. दुसरी गोष्ट म्हणजे मी देशभक्त आहे. यासाठी देश सुरक्षित राहण्यासाठी आमचे सरकार जो निर्णय घेईल मी त्यानिर्णयासोबत असेन. मात्र त्याचबरोबर जे खरे गुन्हेगार आहेत त्यांच्याविरोधात लढण्यापेक्षा कलाकारांनाच का लक्ष्य केले जाते. उरीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर मी खूप अस्वस्थ होते असे तिने सांगितले.