अभिमानास्पद : प्रजासत्ताकदिनी इतिहास रचणाऱ्या भावना कंठ, परेड मध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  यंदाचा प्रजासत्ताक दिन खूप खास आणि गर्वाचा असणार आहे. वास्तविक हवाई दलाची पहिली महिला लढाऊ पायलट भावना कंठ देखील यंदा राजपथ वर दिसणार आहे. भावना या भारतीय वायुसेनेच्या फायटर पायलट गटा मधील समाविष्ट केलेल्या तिसरी महिला पायलट आहे. रेकार्ड बद्दल बोलावं तर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणाऱ्या त्या पहिल्या महिला लढाऊ पायलट असतील. भावना कंठ ह्या भारतीय वायुसेनेच्या तर्फे निघणाऱ्या झाकीची   मेजवानी करणार ज्याची थीम मेक इन इंडिया असेल.  
				  													
						
																							
									  
	 
	''हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे''
	 
	प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील होण्याच्या बातमीवर भावना कंठ म्हणतात की हे त्यांच्या साठी खूपच अभिमानाचा क्षण आहे. पायलट असलेल्या भावना म्हणतात की त्या बालपणापासून टीव्हीवर प्रजासत्ताक दिनाची परेड बघत आल्या आहेत, आणि आता या मध्ये त्यांना सामील होण्याची संधी मिळत आहे ही माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. भावना म्हणतात की त्यांना राफेल आणि सुखोई सह इतर लढाऊ विमान उड्डाण करायला आवडेल.
				  				  
	 
	हे देखील आपली शक्ती दाखवणार -
	राजपथ परेडमध्ये सुखोई लढाऊ विमान देखील आता आपले पराक्रम दाखवणार आहे. तसेच ध्रुव,रुद्र आणि एमआय- 17 सह अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे आणि हेवीवेट हेलिकॉप्टर चिनुक देखील आपले शक्ती आणि जौहर दाखवणार आहे. वाहतूक विमान सी-17 ग्लोबमास्टर आणि सी-130 जे हर्क्युलिस देखील आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करतील. वायुसेनेच्या मार्चिंग पथकामध्ये सुमारे 100 वायुसैन्य असणार ज्यामध्ये 4 अधिकारी आहे. या पथकाचे नेतृत्व फ्लाईट लेफ्टनंट तनिक शर्मा करणार आहेत. यंदाच्या वायुसैन्येच्या झाकीमध्ये लढाऊ विमान तेजस,सुखोई सह रोहिणी रडार चे प्रदर्शन देखील केले जाणार आहे. प्रजासत्ताकदिनी या वेळी बांगलादेशी सैन्य देखील उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान पाकिस्तानवर भारताच्या विजयाचा 50 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. झांकी मध्ये आकाश आणि रुद्रम मिसाईलसह अँटी टॅंक मिसाईल चे देखील प्रदर्शन केले जाणार आहे. या शिवाय वायुसेनेचा 75 सदस्यीय बँड देखील राजपथावर आपल्या सुमधुर स्वराने प्रेक्षकांना मंत्र मुग्ध  करणार आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	राजपथावर प्रथमच गर्जना करणार राफेल-
	भारतीय वायुसैन्याचा ब्रह्मास्त्र राफेल लढाऊ विमान प्रजासत्ताकदिनी प्रथमच राजपथावर गर्जनासह आपले सामर्थ्य आणि क्षमतेचे प्रदर्शन करणार. वायू सैन्य फ्रांस कडून खरेदी केलेले पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमान राफेल प्रथमच प्रजासत्ताकदिनाच्या परेड मध्ये काढणार आहे आणि हे यंदाच्या परेडचे मुख्य आकर्षण असणार. प्रजासत्ताक दिनी दोन राफेल राजपथावर आपले जोहर दाखविणार आहे.