नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्र, वेबसाईट, सोशल मीडियावर प्रसिद्ध करा
नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रे, वेबसाईटवर प्रकाशित करा, असे महत्त्वाचे आदेश सुप्रिम कोर्टाचे देशातील सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. राजकारणाचे गुन्हेगारीचा विचार करता सुप्रीम कोर्टाचे आदेश अतिशय महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता सर्व राजकीय पक्षांना ही माहिती आपल्या फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही ही माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे.
हा आदेश देताना सुप्रीम कोर्टाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. ही चिंता व्यक्त करताना सुप्रीम कोर्टाने देशातील राजकीय पक्षांनी आपल्या नेत्यांवरी गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रे, वेबसाइट्स, फेसबुक, ट्विटर अशा सर्व माध्यमांद्वारे प्रसिद्ध करून त्याबाबत जनतेला माहिती द्यावी असे आदेश दिले आहेत.