सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (15:06 IST)

Meena आहे ना आपल्यासोबत गप्पा मारायला, Google चॅटबॉट

सोशल मीडियावर दिवस भर वेळ घालवताना बोर झाला असाल आणि कोणी गप्पा मारायला हवं असेल तर Meena आहे आपल्याशी गप्पा मारण्यासाठी. हा एक नवीन पर्याय आहे अर्थातच एक नवं डिव्हाइस.
 
आतापर्यंत आपण व्हॉइस असिस्टंट अ‍ॅपच्या मदतीने माहिती, बातम्या, गाणी इतर घडामोडी जाणून घेता पण गप्पा मारायच्या असतील तर हे अॅप काही कामाचे नाही. हेच लक्षात घेत गूगलने नवीन चॅटबॉट आणलाय. या बोलक्या असिस्टंटचं नाव Meena असे आहे. Meena आपल्या उत्तर देईल आणि यासोबत आपण मनसोक्त गप्पा मारु शकता, असा दावा कंपनीने केलाय.
 
Meena सोबत कोणत्याही विषयावर बोलता येईल. रिपोर्टनुसार Meena मध्ये जवळपास 2.6 बिलियन पर्याय आहेत. Meena ला जवळपास 40 अब्ज शब्द सामील करण्यात आले आहेत. कंपनीप्रमाणे अनेक सोशल मीडिया चॅटच्या आधारे Meenaची निर्मिती करण्यात आली आहे. Meena आपल्याला हसवण्यासाठी जोक देखील सांगेल. 
 
कंपनीकडून इतर कोणत्याही चॅटबॉटपेक्षा Meena उत्तम असल्याचा दावा केला जात आहे. तज्ज्ञांनुसार Meena मध्ये सिंगल इवॉल्वड ट्रांसफॉर्मर इनकोडर आणि 13 इवॉल्वड ट्रांसफॉर्मर डीकोडर ब्लॉक्स दिल्यामुळे Meena ला बोलणं समजावण्यात आणि उत्तर देण्यासा मदत करेल. 
 
‘सेन्सिबलनेस अँड स्पेसिफिसिटी अ‍ॅव्हरेज’ (SSA) या टेस्टमध्ये Meena ला 79% गुण मिळाले जेव्हाकि या टेस्टमध्ये मानवांची रँकिंग सामन्यतः 86 टक्के येते.
 
मात्र सामान्य युजर्ससाठी Meena कधीपर्यंत उपलब्ध होईल, याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही.