शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (22:45 IST)

पंजाबच्या मंत्र्याचा चालत्या वाहनात जीवघेणा स्टंट, वाहतूक नियमांचे उल्लंघन

पंजाबचे परिवहन मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांच्या जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भुल्लर साहिब वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. 
 
वास्तविक भुल्लर एका हायस्पीड कारमध्ये स्टंट करताना दिसत आहे. कारच्या सन रूफवर बसून मंत्री कसे हात हलवताना दिसले, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर  सुरक्षा रक्षकही गाडीच्या खिडकीतून बाहेर लोम्बकळताना दिसले, ज्यांचा जीवही धोक्यात दिसला. चालत्या वाहनातून सनरूफमधून बाहेर पडणे हा गुन्हा आहे, जो मोटार वाहन कायद्याच्या कलम 184f चे उल्लंघन आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.मंत्रींच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात परिवहन मंत्री भुल्लर म्हणाले की, माझे काही चुकले असेल तर मी माफी मागतो.