रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2023 (23:09 IST)

राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट

rahul gandhi sharad panwar
ANI
Rahul Gandhi met Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार सध्या काही कारणास्तव दिल्ली दौऱ्यावर आहेत.
 
पवारांच्या दिल्ली दौऱ्यात विविध नेते त्यांची भेट घेताना दिसत आहेत. यामध्ये आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
 
ANI वृत्तसंस्थेने या भेटीचा व्हीडिओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. आज सकाळी शरद पवार यांनी एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. तसंच विविध बैठकाही त्यांनी याठिकाणी घेतल्या. यानंतर दोन्ही नेत्यांची सायंकाळी भेट झाली. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड हेसुद्धा उपस्थित होते.