बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

’सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला राज यांची व्यंगचित्रातून श्रद्धांजली

कामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला, असे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.
 
जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. फर्नांडिस यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी देखील मंगळवारी दुपारी ट्विटरवर व्यंगचित्र शेअर करत जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली.