तर देश खड्ड्यात जाईल - राज ठाकरे
देशात सुरु असलेल्या नोटबंदी आणि बदलावर अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका करत जर हा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल असे सांगितले आहे. काळा पैशाला आळा घालण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण काळा पैसा असणाऱ्यांवर धाडी का टाकल्या नाहीत? सामान्य लोक रांगेत का आहेत? बँकांच्या रांगेत उभे राहत जवळपास ४० लोक गेली जी सामान्य माणसे होती. यात एकही काळा पैसेवाला आहे का? असे अनेक प्रश्न विचारत टीका केली आहे.