शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 मे 2020 (08:37 IST)

सायकल चोरीचे 'हे' पत्र सध्या इंटरनेटवर आहे खूप चर्चेत

राजस्थानच्या भरतपूर येथील एका मजुराने उत्तर प्रदेशमधील बरेली येथे जाण्यासाठी सायकलच चोरली. सायकलची चोरी केल्यानंतर गलितगात्र झालेल्या या मजुराने एक पत्र सोडले आहे, या पत्रातील मजकुरामुळे हे पत्र सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरले आहे.
 
मोहम्मद इक्बाल खान असे या मजुराचे नाव आहे. भरतपूर मधील सहानावली या गावातून साहीब सिंह नामक व्यक्तिच्या घराबाहेरील सायकल या मजुराने चोरली. आपल्या अंपग मुलाला बरेलीत परत नेण्यासाठी त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ही सायकल चोरी केल्यानंतर त्याने भरतपूर ते बरेली असा २५० किमींचा प्रवास पुर्ण केला. ही सायकल चोरी करत असताना मोहम्मदने एक पत्र लिहून साहीब सिंह यांची माफी मागितली आहे. 
 
इक्बाल खानने पत्रात लिहिले की, “मी मजूर आहे आणि मजबूर देखील. मी तुमचा गुन्हेगार देखील आहे. तुमची सायकल घेऊन जात आहे. मला क्षमा करा. मला बरेलीपर्यंत जायचे आहे. माझ्याजवळ कोणतेच साधन नाही. शिवाय एक दिव्यांग मुलगा देखील सोबत आहे.” इक्बाल खानचा मुलगा चालू शकत नसल्यामुळे त्याने हे कृत्य केले अशी प्रांजळ कबुली देखील त्याने दिली.