नेट परीक्षेची तारीख लवकरच जाहीर

Ramesh Pokhriyal
नवी दिल्ली| Last Modified शनिवार, 16 मे 2020 (16:31 IST)
राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) 2020 च्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.
वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील शिक्षकांशी संवाद साधला. ज्यांनी
नवोदय विद्यालयाची भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना लॉकडाउननंतर नियुक्ती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या देश अभूतपूर्व अशा आरोग्य विषयक आणिबाणीच्या परिस्थितीतून जात आहे. पालक आणि विद्यार्थी दोघांनाही आपापल्या विवंचना आहेत. अशावेळी शिक्षकांची जबाबदारी वाढते. कारण ते एकाच वेळी बरच मुलांचे पालक असतात आणि त्यांना कोणताही पक्षपात न करता प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. शिक्षकांनी त्यांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत. शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे देशातील ऑनलाईन शिक्षण व्यवस्था यशस्वी झाली आहे. बरेच शिक्षक तंत्रज्ञानामध्ये तज्ञ नव्हते परंतु तरीही त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्वतः प्रशिक्षण घेतले आणि ऑनलाइन शिक्षणामध्ये योगदान दिले आहे, असे पोखरीयाल यांनी सांगितले.

लॉकडाऊन नंतर शाळा सुरू करण्याबाबत ते म्हणाले शाळा प्रशासन आणि शिक्षक हे शाळा स्तरावर सर्व संबंधितांच विशिष्ट भूमिका व जबाबदार निश्चित करणे, आरोग्य व स्वच्छता आणि इतर गोष्टी निश्चित करणे यासारखी विविध कामे पार पाडतील.
शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या विषयावर बोलताना म्हणाले की, ऑनलाइन शिक्षण प्रणालीसाठी पूर्ण तयारीनिशी प्रशिक्षण सुरु असून लाखो शिक्षकांनी याचा लाभ घेतला आहे. ई-लर्निंग संसाधनांच्या वापरासाठी पंडित मदन मोहन मालवी राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण अभियानांतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षकांचा सहभाग वाढला असून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्वतःला नवीन तंत्रज्ञानाशी जोडण्याची तयारी शिक्षकांनी दर्शविली आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

बघा, निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?

बघा, निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?
3 जून दुपारी 4 वाजेच्या सुमारास : चक्रीवादळ अलिबाग येथून मुंबई किनारपट्टीवर, त्यानंतर ...

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार
मात्र बिहारच्या नितीश सरकारने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत कंडोमचं वाटप
इतर राज्यांमधून आपल्या घरी परतलेल्या बिहारमधील कामगारांसाठी स्थानिक राज्य सरकारच्या ...

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर ...

राज्यसभेच्या १८ जागांवर १९ जून ला मतदान

राज्यसभेच्या १८ जागांवर १९ जून ला मतदान
राज्यसभेच्या १८ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. राज्यसभेच्या १८ जागांवर ...