संबंधित माहिती
- आर्थिक पॅकेज जाहीर झाल्याने सेन्सेक्स-निफ्टीने बाजारात तेजी आणली
- विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केलेल्या चौघा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले
- मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज
- महाराष्ट्रात रुग्णांची संख्या संख्या २३ हजार ४०० च्या पुढे
- विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर
यूपीएससी परीक्षेची तारीख 'या' दिवशी होणार जाहीर
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तारीख पुढील आठवड्यात जाहीर केली जाईल. आयोगाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, नागरी सेवा परीक्षेची तारीख 20 मे रोजी जाहीर केली जाणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 31 मे रोजी घेण्यात येणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे देशभर असलेल्या लॉकडाउन स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलणत आली.
सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची नवीन तारीख आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल upsc.gov.in या वेबसाइटवर उमेदवार परीक्षेची तारीख आणि परीक्षेसंबंधीची सर्व माहिती पाहू शकतील. नागरी सेवा परीक्षा 3 टप्प्यात होते. पहिल टप्प्यात पूर्व परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसण्याची संधी मिळते. यानंतर, मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. अंतिम गुणवत्ता यादी मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील कामगिरीच्या आधारे तयार केली जाते. मुख्य परीक्षा 1750 गुणांची असते तर मुलाखतीला 275 गुण असतात.
पुढील लेख