शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2020 (22:41 IST)

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या संख्या २३ हजार ४०० च्या पुढे

महाराष्ट्रात १२३० नवे करोना रुग्ण आढळले असून राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या २३ हजार ४०१ इतकी झाली आहे. करोनाची लागण झाल्याने २४ तासात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ८६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
आज महाराष्ट्रात ५८७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या ४ हजार ७८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
 
२४ तासांमध्ये ज्या ३६ रुग्णांचा मृत्यू झाला त्यामध्ये मुंबईतले २०, सोलापुरातले ५, पुण्यातले ३, ठाण्यातले २, १ अमरावतीत, १ औरंगाबादमध्ये, १ नांदेडमध्ये, १ रत्नागिरीत, १ वर्ध्यातला रुग्ण आहे. उत्तर प्रदेशातील एका रुग्णाचा मृत्यू मुंबईत झाला आहे.
 
ज्या ३६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला त्यामध्ये २३ पुरुष आणि १३ महिला रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रात आता करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८६८ इतकी झाली आहे.