शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 डिसेंबर 2023 (17:38 IST)

Rajasthan : लग्नाच्या 4 तासांत नवरदेवाला फसवून नवरी पसार

लग्नानंतर नववधू आणि नवरदेवाचं आयुष्यच बदलून जातं. नवीन स्वप्न घेऊन ते नव्या आयुष्यात प्रवेश करतात. पण लग्नानंतर नवरदेवा सोबत जे काही घडलं त्याची त्याने कधीच कल्पना केली नसणार. लग्नानंतर अवघ्या चार तासातच फसवी नवरी नवरदेवाची फसवणूक करून पसार झाली.राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातील चौरासी गावात पोलिसांनी एका बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून नवरी आणि तिच्या टोळीला ताब्यात घेतलं आहे. 
 
हे प्रकरण राजस्थानचे आहे. डुंगरा गावातील भटू भाई रावल या तरुणाचं लग्न भिंडा गावातील नीता बेन नावाच्या तरूणीशी एका मध्यस्थीच्या साहाय्याने ठरलं.मध्यस्थी असलेला ललित नावाच्या व्यक्तीने 2 लाख 20 हजार रुपये घेऊन हे लग्न ठरवलं. त्यांनी ऍडव्हान्स म्हणून आधीच 1 लाख 20 हजार रुपये घेतले. उर्वरित पैसे लग्न नंतर देणार असे नवरदेवाने सांगितले. 

लग्नाची तारीख ठरली आणि 5 नोव्हेंबर रोजी नवरदेव वऱ्हाड घेऊन नवरी आणायला नवरीच्या घरी गेला. दोघांचं लग्न व्यवस्थितरित्या शांततेत पार पडलं. लग्नानंतर नववधू ला घेऊन नवरदेव घरी यायला निघाला. पुढे काय होणार याची त्याने स्वप्नात देखील कल्पना केली नसेल. 

घरी परतताना नववधू ने नवरदेवाला मला नवीन कपडे घ्यायचे आहे असं म्हणून गाडी थांबवायला लावली. नववधू गाडीतून खाली उतरली. नवरदेवाला काही समजेल तितक्यातच मागून एक बाईकस्वार आला आणि नववधू चक्क त्याच्या बाईकवर बसून पसार झाली. काहीतरी गोंधळ झाला आहे असं म्हणत नवरदेवाने थेट पोलीस ठाणे गाठले आणि घडलेलं सर्व सांगितले. पोलिसांनी तपास सुरु केला आणि अखेर दीड महिना नंतर पोलिसांनी फसवी नवरी आणि मध्यस्थीला अटक केली. 
 
Edited By- Priya DIxit