सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 17 जून 2023 (12:06 IST)

Ranchi :घोडा आणि बग्गी सोडून नवरीला आणण्यासाठी जेसीबी घेऊन नवरदेव गेला

social media
लग्न म्हटलं की घरात सनई चौघड्याच्या आवाजात , नाचत गाजत नवरदेव नवरीला आणण्यासाठी वऱ्हाडी सह कार मध्ये किंवा घोड्यावर किंवा बग्गीत मिरवणूक काढत जातो. आणि तिला सासरी घेऊन येतो. सध्या आपल्या लग्नात काही हटके करण्याचा छन्द लागला आहे. आपले लग्न अविस्मरणीय व्हावे असे प्रत्येकाला वाटते.  पण सध्या झारखंडच्या रांची येथून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये नवरदेवाने नवरीला घरी आणण्यासाठी जेसीबी नेली आहे. जेसीबी फुलांनी सजवलेली आहे. वाजंत्री आणि बँड वाल्यासह नवरदेव वधूला आणण्यासाठी गेला आणि परत त्याने त्या जेसीबीत नवरीला बसवून घरात आणले. हा व्हिडिओ @Akshara117 ने ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - रांचीमध्ये वधूला घेण्यासाठी वर जेसीबीमध्ये आले. 
 
रांचीतील टाटी सिलवे याठिकाणी फुलांचे काम करणारा कृष्णा महतो ह्याचे लग्न चतरा गावातील आरतीशी ठरले. 13 जूनच्या रात्री कृष्णाची मिरवणूक जेसीबीने वधूला आणण्यासाठी निघाली आणि त्याच्या गावापासून 10 किमी दूर वधूच्या घरी पोहोचली. 

नवरदेवाला जेसीबीत पाहून सासरच्या मंडळींना आश्चर्य झाले.खणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेसीबीच्या वापर असाही होऊ शकतो याचे सर्वांना आश्चर्य झाले. जेसीबीत जाडसर गाद्या टाकल्या होत्या. लग्नानंतर मुलीच्या घरच्यांनी तिला निरोप दिला. जेसीबीत  बसवून कृष्णाने आरतीला घरी आणले. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  
 


Edited by - Priya Dixit