शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (12:38 IST)

मृतदेहासोबत दुष्कर्म, कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीचे खुलासे ऐकून मन हेलावून जाईल

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज देशभरातील डॉक्टर संपावर आहेत. आरोपी संजय रॉय पोलिसांच्या ताब्यात असून, त्याने चौकशीदरम्यान असे खुलासे केले, की पोलिसांचेही रक्त उकळले.
 
आरोपीने गुन्ह्याची कबुली देताना महिला डॉक्टरवर कसा आणि किती प्रमाणात अत्याचार केला याचा खुलासा केला. ही घटना 8 ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. 9 ऑगस्ट रोजी सकाळी महिला डॉक्टरचा मृतदेह बिघडलेल्या अवस्थेत आढळून आला. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (फोर्डा) या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी अनेक दावे केले आहेत-
 
झोपेत हत्या आणि नंतर बलात्कार
मीडिया रिपोर्ट्सनुसार मृताच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र पोलिसांनी दावा केला आहे की आरोपीने महिला डॉक्टरची झोपेत असताना हत्या केली होती. त्याने तिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर मृतदेहावर बलात्कार केला. यावेळी त्याने क्रूरता दाखवत मृत डॉक्टरच्या अंगावर जखमा केल्या. मृत्यू होऊन फार काळ लोटला नसल्यामुळे जखमांमधून रक्त वाहत होते.
 
घरी जाऊन रक्ताने माखलेले कपडे आणि बूट धुतले
गुन्हा केल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपी संजयने चौकशीत कबुली दिली की, गुन्हा केल्यानंतर तो घरी जाऊन झोपला आणि सकाळी उठून अंगावर रक्त असल्याने कपडे व बूट धुतले. आरोपीच्या बुटावर रक्ताचे डाग आढळून आले. त्याच्या सांगण्यावरून घटनेच्या वेळी परिधान केलेले कपडेही जप्त करण्यात आले आहेत.
 
घटनेपूर्वी पॉर्न व्हिडिओ पाहिला होता
आरोपी संजयला दारू पिण्याचे आणि पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याचा फोन पॉर्न व्हिडिओंनी भरलेला आहे. गुन्ह्यापूर्वीही त्याने दारूचे सेवन केले होते आणि दारू पिऊन अश्लील व्हिडिओही पाहत असल्याचे त्याने चौकशीत उघड केले.
 
4 विवाह आणि 3 पत्नी सोडल्या
आरोपी संजयचे वर्तन चांगले नसल्याचे समोर आले आहे. त्याने 4 वेळा लग्न केले होते, परंतु त्याच्या वाईट चारित्र्यामुळे त्याच्या 3 बायका त्याला सोडून गेल्या होत्या. तिघांनीही त्याला घटस्फोट दिला होता. चौथी पत्नी कर्करोगाने मरण पावली. गेल्या वर्षीच त्यांची चौथी पत्नी मरण पावली.
 
रुग्णालयात प्रवेश कोणत्याही निर्बंधाशिवाय उपलब्ध होता
रुग्णालय प्रशासनाने आरोपी संजयकडे चौकशी केली असता संजय हा स्वयंसेवक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा रुग्णालयाशी कोणताही अधिकृत संबंध नव्हता, पण स्वयंसेवक असल्याने तो कोणत्याही बंधनाशिवाय रुग्णालयात येत-जात असत. यामुळे गुन्हा केल्यानंतर तो सहजपणे रुग्णालयातून निघून गेला आणि कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही, कारण गुन्ह्याच्या रात्रीही तो रुग्णालयात दाखल होताना दिसला.
 
ही घटना 4 ते 6 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. घटनेच्या रात्री तो रुग्णालयात आल्याचे आरोपीने उघड केले आहे. रात्री अकराच्या सुमारास तो दारू पिण्यासाठी रुग्णालयाच्या मागे गेला होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार संजय चार वाजण्याच्या सुमारास मागच्या दाराने चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये प्रवेश करताना दिसला. त्यानंतर साडेपाच वाजण्याच्या सुमारास तो सेमिनार हॉलमधून बाहेर येताना दिसला.