1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. ravindra gayakwad

पुन्हा एकदा गायकवाड यांचे विमान तिकीट रद्द

एअर इंडियाने पुन्हा एकदा उस्मानाबादचे शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचे मुंबई-दिल्ली विमान प्रवासाचे तिकीट रद्द केले आहे. बुधवार सकाळची गायकवाड यांची मुंबई ते दिल्ली प्रवासाची तिकीट एअर इंडियाने रद्द केली.  मागच्या आठवडयात रविंद्र गायकवाडांनी एअर इंडियाचे मॅनेजर आर. सुकूमार यांना चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियासह अन्य भारतीय विमान कंपन्यांनी त्यांचा नो फ्लाय लिस्टमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे रविंद्र गायकवाडांच्या देशातंर्गत विमान प्रवासावर बंदी आली आहे.
पुढील लेख
निर्घृण हत्या : पती-पत्नीसह मुलीला खड्ड्यात पुरले