बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 29 मे 2021 (19:29 IST)

RBI कडून लवकरच 100 रुपयांची नवीन नोट जारी

नवी दिल्ली : रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)100रुपयांची नवीन नोट आणणार आहे. याची विशिष्ट  बाब म्हणजे नोट चमकदार असणार आहे. ही नोट टिकाऊ असेल. मोठ्या प्रमाणात ही नोट भारतीय चलनात आणण्यात येणार आहे.
ही नवीन नोट वार्निश पेंट केल्याने फाटणार नाही,पाण्यात भिजणार देखील नाही.या मुळे ही नोट जपून ठेवण्याची गरज देखील नाही.रिझर्व बँकेला दरवर्षी लाखो करोडो रुपयांच्या फाटलेल्या, खराब झालेल्या नोटांना रिप्लेस करावं लागतं. जगातील अनेक देश प्लॅस्टिकच्या चलनी नोटांचा वापर करीत आहेत. 
 
या नोटेचे डिजाईन असे केले आहे ज्यामुळे हे दृष्टीहीन लोकांना देखील सहजपणे ओळखता येईल.या नोटांच्या चांगल्या क्वालिटी साठी मुबंईत बँकनोट क्वॉलिटी एश्योरंन्स लॅबोरेटरी स्थापित  केली आहे.