गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑगस्ट 2021 (10:11 IST)

कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार - हिमंत बिस्वा सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोराम पोलिसांनी FIR दाखल केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, "कुठल्याही चौकशीला आनंदानं सामोरं जाईन. पण एखाद्या तटस्थ यंत्रणेकडे चौकशीचं काम का सोपवलं गेलं नाहीय?"
हाच प्रश्न आपण मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांच्यासमोरही उपस्थित केल्याचं हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटलं
 
आसाम आणि मिझोराममध्ये सध्या सीमावाद सुरू आहे. सोमवारी (26 जुलै) मिझोराम आणि आसाममधील सीमेवर झालेल्या संघर्षात आसाम पोलिसांचे पाच जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
 
याच प्रकरणी मिझोराम पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचंही नाव आहे.