मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2024 (16:03 IST)

काँग्रेसला आयकर विभागाकडून दिलासा

congress
लोकसभा निवडणुकी दरम्यान प्राप्तिकर विभागाने पाठवलेल्या नोटीस प्रकरणी अडचणीत सापडलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसच्या पक्षाकडून 1745 कोटी रुपये वसूल करण्यासाठी कोणतेही कठोर पाऊल घेतले जाणार नाही असे आयकर विभागाने सर्वोच्च न्यायालयात निवेदन दिले. 
 
आयकर विभागाने म्हटले आहे कीं निवडणुकीत कोणत्याही पक्षाला अडचणीत आणण्याचे ते इच्छित नाही. आयकर विभागाच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाला दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी, काँग्रेसला पुन्हा एकदा आयकर विभागाकडून एक नवीन नोटीस मिळाली होती, ज्याद्वारे 2014-15 ते 2016-17 या मूल्यांकन वर्षासाठी 1,745 कोटी रुपयांच्या कराची मागणी करण्यात आली होती.
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाविरुद्ध कोणतीही जबरदस्ती कारवाई केली जाणार नाही, असे आयकर विभागाचे प्रतिनिधीत्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेतले.
 
काँग्रेसकडून हे कर वसुली प्रकरण जूनमध्ये सुनावणीसाठी पोस्ट करण्याची विनंती आयकर विभागाने न्यायालयाला केली आहे. आयकर विभागाचे म्हणणे आहे की, निवडणुकीदरम्यान कोणत्याही पक्षाला अडचणीत आणायचे नाही. विभागाच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत काँग्रेसकडून एकूण 3,567 कोटी रुपयांच्या कराची मागणी केली आहे

Edited by - Priya Dixit