1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. relly of 15th august

१५ ऑगस्टला रॅलीचे आयोजन

भाजप सरकारविरोधात ‘लोकांचे दोस्त’ आणि समविचारी संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी दादरमध्ये ‘तिरंगा उठाव, भाजप हटाव’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि समाजातील मान्यवर व्यक्ती सहभागी होणार आहेत. मुंबईतील दादर येथी वीर कोतवाल उद्यानातून दुपारी २ वाजता ही रॅली सुरू होईल. यानंतर शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सांगता होणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.
 
पुढील लेख
संशयिताला अटक, 8 देशी बॉम्बसह स्फोटकं बनवण्याचं साहित्य जप्त