गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ फली एस नरिमन यांचे निधन

Renowned jurist Fali S Nariman passes away
प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील फली एस नरिमन यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी दिल्लीत अखेरचा श्नास घेतला. इंदिरा गांधी सरकारच्या काळात ते देशाचे अतिरिक्त स़ॉलिसिटर होते. त्यांना लिविंग लीजेंड देखील म्हटलं जातं.  
 
मुंबई हायकोर्टात १९५० मध्ये वकील म्हणून त्यांनी कामकाज सुरु केले. बुद्धी आणि अभ्यासाच्या जोरावर सुरुवातीच्या काळातच त्यांनी नाव कमावले. ते गेले ७० वर्षात कायदा क्षेत्रात आहेत. १९७२ मध्ये ते सुप्रीम कोर्टात दाखल झाले. मुंबईतून दिल्लीत आल्यानंतर त्यांच्याकडे सॉलिसिटर जनरलची जबाबदारी देण्यात आली होती.
 
नरिमन हे बार कॉन्सिलचे १९९१ ते २०२० काळात अध्यक्ष होते. इंटरनॅशनल कॉन्सिल फॉर कमरसियल आर्बिटिरेशनचे ते अध्यक्ष देखील होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. भारताचा न्यायिक व्यवस्थेवर त्यांचा गाढा विश्वास होता.
 
प्रख्यात कायदेतज्ज्ञ म्हणून ओखळ असलेल्या फली एस नरिमन यांचा १९९१ मध्ये पद्म भूषण आणि २००७ मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मान करण्यात आला आहे.