1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (14:52 IST)

Telangana CM: रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, भट्टी विक्रमार्क उपमुख्यमंत्री

revanth reddy
Telangana CM oath Ceremony तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाचे नावही निश्चित झाले आहे. रेवंत रेड्डी राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. आज राजधानी हैदराबादमध्ये त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे अनेक बडे नेते हैदराबादला पोहोचले आहेत.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंग हुड्डा, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व बडे नेते हैदराबादला पोहोचले आहेत.
 
काँग्रेस नेत्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री-नियुक्त रेवंत रेड्डी विमानतळावर पोहोचले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व 119 विधानसभा जागांपैकी काँग्रेसला 64 जागा मिळाल्या आहेत. तर बियारेस यांनी 39 तर भाजपने 8 जागा जिंकल्या आहेत.