शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (10:11 IST)

RIP RISHI KUMAR : शहीद लेफ्टनंट ऋषीकुमार पंचतत्वात विलीन झाले

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शनिवारी नियंत्रण रेषेवर गस्तीदरम्यान भूसुरुंगाच्या स्फोटात शहीद झालेले बिहारचे सुपुत्र लेफ्टनंट ऋषी कुमार यांचे पार्थिव पंचतत्त्वात विलीन झाले. बेगुसराय येथील सिमरिया घाटावर शहिदांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकांनी पाणावल्या डोळ्यांनी बिहारच्या सुपुत्राला निरोप दिला.
 
शहीद लेफ्टनंट ऋषी कुमार यांचे पार्थिव रविवारी रात्री उशिरा पाटणा विमानतळावर पोहोचले. जिथे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद, खासदार सुशील मोदी आणि इतर अनेकजण उपस्थित होते. शहीदांचे पार्थिव पाटणा येथून त्यांच्या मूळगावी जिल्हा बेगुसराय येथे आणण्यात आले. त्यांचे शेवटचे दर्शन करण्यासाठी बेगुसरायमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. लेफ्टनंट ऋषी कुमार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जिल्ह्यातील जीडी महाविद्यालय परिसरात ठेवण्यात आले होते.

जीडी कॉलेज कॅम्पसमध्ये लष्कराच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली आणि श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव सिमरिया घाटात आणण्यात आले जेथे शहीद ऋषी कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला.

शनिवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) पोस्टजवळ गस्त घालणारे एक पथक भूसुरुंगाखाली झालेल्या स्फोटात बळी झाले. ज्यात दोन जवान शहीद झाले होते. स्फोटात शहीद झालेल्या दोन जवानांमध्ये बिहारच्या बेगुसराय येथील रहिवासी लेफ्टनंट ऋषी कुमार यांचाही समावेश आहे.