1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (16:27 IST)

Road Accident :हिमाचलच्या चंबा येथे बस चालकाचे नियंत्रण सुटून बस घराला धडकली, 34 प्रवासी जखमी

Road Accident: At Chamba
हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात रविवारी एका बसने एका घराला धडक दिली, त्यात 34 जण जखमी झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आणि बस एका घरावर पडली. या अपघातामुळे बसमध्ये प्रवास करणारे 34 जण जखमी झाले आहेत, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासगी बसचा अपघात चंबाहून भरमौरकडे जात असताना करियनजवळ झाला. बस लिल्हाहून चंबाकडे धारवाला मार्गे जात होती. वृत्तानुसार, सराई नाल्याजवळ पोहोचण्यापूर्वी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्यावर उतरली आणि एका घराला धडकली.