बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (10:30 IST)

Rohtak : एकाच कुटुंबातील 3 मुलांचा दुर्देवी मृत्यू

death baby
Rohtak  News: हरियाणातील रोहतकमधील शिवाजी कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालंद गावात एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.15 ऑगस्टच्या रात्री घरी तयार केलेली पेठेची भाजी खाल्ल्याने कुटुंबाची तब्येत बिघडल्याची घटना समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

बालंद गावात एकाच कुटुंबातील 9 जणांची  प्रकृती 15 ऑगस्ट रोजी बिघडली. कुटुंबातील सदस्यांनी पेठ्याची भाजी खालली  होती. रात्री सर्वांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांनीं तातडीनं डॉक्टरला दाखवले डॉक्टरांनी त्यांना औषध देऊन घरी पाठवले. नंतर त्यांची प्रकृती बिघडली त्यांना पुन्हा जवळच्या रुग्णालयात नेले असता उपचाराच्या दरम्यान कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

दिव्या (7),इयांशु(2) आणि लक्षिता (8)  असे या मयतांची नावे आहेत. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेश आणि राकेश हे दोघे भाऊ. सध्या कोणीही बोलण्याच्या स्थितीत नाही. डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. कुटुंबातील 65 वर्षीय कृष्णा यांनी पोलिसांना सांगितले की, काल रात्री घरी पेठा करी तयार करण्यात आली होती. हे अन्न खाऊन सर्वजण झोपले. नंतर त्यांची प्रकृती खालावली. राकेश शेतीची कामे करतो. राजेश ट्रान्सपोर्टमध्ये काम करतो. सध्या सर्वांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रकरणी गुरुवारी कुटुंबीयांचे म्हणणे व तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात येणार आहे. अन्नाचे नमुनेही घेतले जाणार आहेत.
 
 
 
 



Edited by - Priya Dixit