1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Saint Bhayuji Maharaj getting marriage again

भय्यूजी महाराज यांचे दुसर्‍यांदा शुभमंगल

अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत. 30 एप्रिल रोजी मध्यप्रदेशातील डॉ.आयुषी यांच्यासोबत त्यांचा दुसरा विवाह होईल. आई आणि बहिणीच्या आग्रहाखातर महाराज पुन्हा लग्न करत असल्याची माहिती आहे.
 
तीन वर्षांपूर्वी महाराज यांच्या वडिलांचं आणि 2 वर्षांपूर्वी पत्नीचं निधन झालं. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ हरवलं होतं. त्यानंतर आई आणि दोन बहिणींच्या आग्रहाखातर महाराजांनी लग्नाचा निर्णय घेतला. महाराजांना कुहू नावाची 13 वर्षांची लहान मुलगीही आहे. भय्यूजी महाराज यांचं वय अंदाजे 48 वर्षे आहे.
पुढील लेख
डॉक्टरांचा इमानवर उपचार करण्यास नकार