शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

रात्रभर महिलांसोबत होते बास्केटबॉल खेळाडू, परतीचे तिकीट

जपानी लोकांचे अनुशासनासाठी नेहमीच कौतुक केले जातं परंतू 18 व्या आशियाई खेळांमध्ये त्यांच्या बास्केटबॉल टीमच्या चार खेळाडूंना महत्त्वाच्या क्वार्टरफायनल सामन्यापूर्वी जकार्ताच्या हॉटेलमध्ये महिलांसोबत रात्र घालवल्यामुळे स्वदेश परतावे लागले. जपानच्या पुरूष बास्केटबॉल टीमला आपल्या खेळाडूंचे बेशिस्त वागणे महागात पडले. टीम सोमवारी इराण विरुद्ध आठ खेळाडूंसह क्वार्टरफायनल मध्ये उतरली आणि त्यांना 67-93 अश्या मोठ्या अंतराने पराभवाचा सामना करावा लागला.
 
जपानच्या ऑलिंपिक समितीने चारी बास्केटबॉल खेळाडूंना जकार्ताच्या एका हॉटेलमध्ये महिलांसोबत रात्र घालवण्याची घटना समोर आल्यावर त्यांचे मान्यता पत्र रद्द केले आहे. या खेळाडूंना नियम उल्लंघन केल्यामुळे लगेच स्वदेश पाठवण्यात आले. जपानी बास्केटबॉल टीमने या घटनेनंतर देखील हाँगकाँग विरुद्ध विजय नोंदवत क्वार्टरफायनलमध्ये आपली जागा बनवली तरी इराण विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.