1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

एका खापदार्थाच्या वादाने दोन देशांना आणले एकत्र

fish dish Indonesian
एका खापदार्थावरून उद्भवलेल्या वादाने दोन शत्रू राष्ट्रांना पुन्हा मैत्रीच्या मार्गावर आणण्यास मदत केली आहे. हे रंजक प्रकरण ब्रिटनमधील आहे. यंदा एप्रिलमध्ये ब्रिटनमध्ये मास्टर शेफ शोमध्ये मलेशियातील शेफ जालि कादिरने चिकन रेनडांग नावाची डिश तयार केली. शोच्या परीक्षकाने हा पदार्थ कुरकुरीत नसल्याचे सांगत ही डिश नाकारली. मांसापासून बनणारी रेनडांग डिश मंद आचेवर नारळ व अन्य मसाल्यांसोबत शिजविली जाते. मांस एवढे शिजविले जाते की तोंडात टाकताच ते विरघळून जाईल. त्यामुळे हा पदार्थ कुरकुरीत नाही, असे परीक्षकाने म्हणणे विचित्र होते. 
 
दुसर्‍या परीक्षकाने त्यात तेल ओतत रेनडांग बहुधा इंडोनेशियन पदार्थ असल्याचे ट्विट केल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले. त्याला प्रत्युत्तर देत जाकार्तातील ग्रिफीनन शॉनरी नामक तरुणीने हा रेनडांगच्या नावाने मलेशिया व इंडोनेशिया यांच्यात वाद लावण्याचा प्रयत्न आहे व आम्ही ते होऊ देणार नाही, असे रीटिव्ट केले. 
 
मलेशिया व इंडोनेशिया शेजारी देश आहेत, मात्र एखाद्या मुद्यावर दोघांध्ये एकमत झाल्याचे फारच कमी वेळा घडते. दोन्ही देशांतील संघर्षाचा दीर्घ इतिहास आहे, पण रेनडांगच्या मद्यावर दोन्ही देश एकत्र आले. हा खापदार्थ मूलतः इंडोनेशियाचाच आहे, पण मलेशियाही त्यावर आपला दावा सांगतो. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील आदिवासींची हा पारंपरिक खाद्यपदार्थ असल्याचे सांगितले जाते. हा पदार्थ तयार होण्यासाठी तब्बल सात तास लागतात.