मंगळवार, 26 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (14:53 IST)

संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या ,तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती

bachhu kadu
देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही यादी जाहीर केली. मुंबईत मंगलप्रभात लोढा हे एकमेव मंत्री आहेत. त्यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद दिले असून दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहराचे व कोल्हापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले. ते शिंदे गटाचे आहेत.
 
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली नाहीय. यामध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी टोला लगावला आहे. संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या ,तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन...५० खोके! एकदम ओके, असं म्हणत वरपे यांनी दोघांना टोला लगावला आहे.