सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 21 मे 2024 (12:50 IST)

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कारने जोरदार धडक दिली आहे. ज्यामध्ये एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी आरोप लावला की, कारने अनेक वेळेस बाईकला धडक दिली. पोलिसांनी कार ड्राइव्हरला ताब्यात घेतले आहे. 
 
नोएडा मध्ये सोमवारी एका कारने बाईकला धडक दिली ज्यामुळे बाईकवर असलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. इतर दोन जण जखमी झाले आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन विद्यार्थी बाईकवरून शाळेत जात होते. ही घटना छपरौला गावाजवळ सकाळी आठ वाजता घडली. मृत विद्यार्थी हा 15 वर्षांचा आहे. 
 
पोलिसांनी सांगितले की, या धडक एवढी भीषण होती की, या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे