शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

65 वर्षीय साधूवर महिलेने केला बलात्कार

जयपूर- पुरूषाने महिलेवर बलात्कार केल्याच्या घटना तुम्ही वाचल्या असतीली. पण राजस्थानमध्ये एका 35 वर्षीय महिलेने 65 वर्षीय साध़वर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 65 वर्षीय पीडित साधूने याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत साधूने महिलेवर बलात्कारचा आरोप केला असून आपली फसवणुक आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला आहे.
 
प्राप्त माहितीनुसार ही घटना राजस्थानातील बुंदी येथील पोलिस ठाणे परिसरातील आहे. येथील गावात राहणार्‍या एका 65 वर्षीय साधूने पोलिसांत तक्रार दिली आहे की गावात राहणार्‍या एका महिलेने आपल्यासोबत बलात्कार केला. तसेच, लैंगिक अत्याचारच्या अरोपात अडकविण्याची धमकीही दिली. धमकी ‍देऊन संबंधीत महिलेने आपल्याकडून 3 लाख रूपयेही लाटले आहेत.
 
पीडित साधूने म्हटले आहे की आरोपी महिलेच्या पतीने आपल्याकडून 20 हजार रूपये उधार घेतले होते. पैसे परत करण्याची मुदत संपल्यावर आपण त्या महिलेच्या पतीकडे पैसे परत म‍ागितले. तेव्हा ती महिला आणि तिच्या पतीने संगनमताने आपल्यासोबत गैरकृत्य केले. तसेच, आपल्याला बलात्काराच्या अरोपाखाली अडकविण्याची धमकीही दिली.
 तसेच, मानसिक छळ करत दोघांनी मिळून आपल्याकडून 3 लाख रूपयेही लाटले. यानंतरही दोघा पती-पत्नीचे मन भरले नाही. त्यांनी माझ्याकडे आणखी 2 लाख रूपयांची मागणी करत असल्याचे साधूचे म्हणणे आहे.
 
दरम्यान, पती-पत्नीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेरी आपण पोलिसांत तक्रार दिल्याचे साधू सांगतो. घटनेचा पुरावा म्हणून साधूने पोलिसांना मोबाइल फोनचे रकॉर्डिंगही दिले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. तसेच आरोपी महिलेला ताब्यातही घेतले आहे. महिलेचा पती अद्याप फरार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.