shahdol: सिकलसेल आजाराने मुलीचा मृत्यू, दुचाकीवरून नेला मृतदेह
shahdol news : शहडोल जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 13 वर्षीय मुलीचा सिकलसेल आजाराने मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर वडील नातेवाईकांसह मुलीचा मृतदेह दुचाकीवर ठेवून सुमारे 70 किलोमीटर अंतर कापण्यासाठी निघाले होते. मात्र, ही बाब जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांना कळताच त्यांनी तातडीने वडिलांना थांबवून वाहनाची व्यवस्था केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह वाहनाने तिच्या गावी नेण्यात आला.
जिल्ह्यातील केशवाहीतील कोटा गावात राहणारे लक्ष्मण सिंह यांची मुलगी माधुरी सिकलसेल या आजाराने ग्रासलेली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.नंतर तिला नेण्यासाठी कोणतेही वाहन मिळाले नाही म्हणून तिचे वडील आणि कुटुंबीय तिचा मृतदेह दुचाकी वरून गावा पर्यंत नेत होते.
हे सर्व माहिती डॉ. परिहार आणि जिल्हाधिकारीना कळल्यावर त्यांनी घटनास्थळी पोहोचून वाहनाची व्यवस्था केली,आणि मृतदेह गावी पोहोचवले.
वडील लक्ष्मण सिंह यांनी सांगितले की त्यांनी रुग्णालयातील कर्मचार्यांकडून शव वाहनाची मागणी केली होती, परंतु वाहन केवळ 15 ते 20 किलोमीटरच्या आत जाऊ शकते. रूग्णालयातील कर्मचार्यांनी मृताचे वडील लक्ष्मण सिंह यांना खाजगी वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र वडिलांकडे तेवढे पैसे नसल्याने ते मृतदेह मोटारसायकलवरून घेऊन जात होते. त्यानंतरच जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने मृतदेह नेण्यासाठी शव वाहनांची व्यवस्था केली.
Edited by - Priya Dixit