मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (16:34 IST)

लाजिरवाणे कृत्य ! स्विमिंग पुलात गैरवर्तन करणाऱ्या राजस्थानच्या डीएसपी ला असे करणे महागात पडले

जयपूर.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये राजस्थान पोलिसांचा एक डीएसपी आणि एक महिला कॉन्स्टेबल पूलमध्ये गैरवर्तन करताना दिसत आहेत.या व्हिडिओमधील सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे या अश्लील व्हिडिओमध्ये त्या महिलेचा मुलगा ही  दिसत आहे.
 
अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांवर विभागीय कारवाई करण्यात आली आहे. नैतिक गैरव्यवहार प्रकरणी विभागाने दोघांनाही निलंबित केले आहे.असे सांगितले जात आहे की या प्रकरणी महिलेच्या पतीने तक्रार केली होती. महिलेच्या पतीने पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदणी करण्याची मागणी केली आहे.
 
पोलीस मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अजमेरच्या ब्यावर सीओ (डीएसपी) हिरालाल सैनी आणि जयपूरमध्ये तैनात महिला कॉन्स्टेबलचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ 7 जुलैचा असल्याचे सांगितले जात आहे.
 
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तपासानंतर मिळालेल्या अहवालाच्या आधारे दोघांना निलंबित करण्यात आले आहे. कॉन्स्टेबलच्या पतीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये असे सांगण्यात आले की महिलेने 31 जुलै 2021 रोजी हा व्हिडिओ तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकला होता.
 
विभागीय माहितीनुसार, निलंबित आरपीएस अधिकारी अजमेर जिल्ह्यातील ब्यावर येथे सीओ म्हणून गेल्या 3 वर्षांपासून कार्यरत आहेत, तर महिला कॉन्स्टेबल जयपूरमध्ये  कार्यरत आहेत.