रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (16:33 IST)

तब्बल ८ तास समुद्रात पोहून तिने रचला विश्वविक्रम

नौदलाच्या नाविकाची १२ वर्षांची मुलगी आणि दिव्यांग असलेल्या जिया राय हिने एक अनोखा विक्रम रचला आहे. जियाने मुंबईच्या वरळी सी–लिंकपासून गेट वे आफ इंडियापर्यंतचे ३६ किलोमीटरचे अंतर अवघ्या ८ तास ४० मिनीटांत जलतरण करीत पार केले. जबरदस्त जिद्दीच्या जोरावर तिने हा विक्रमच रचला आहे. नाविक मदन राय यांची ती सुपुत्री असून यापूर्वी तिने गिनेस बुक आफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नाव नोंदविले आहे.
 
जिया राय कुलाब्यातील नेव्ही आफिसर कॉलनीत राहते. तिची आई रचना राय सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षक आहे. मुळात जिया ही अपंग आहे. मात्र तिने आपल्या अपंगत्वावर मात करून दोन महिन्यांपूर्वी २२ किलोमीटरचे अंतर ७ तास ४ मिनीटांमध्ये पार करून विश्वविक्रम रचला होता. तर यंदा महाराष्ट्र जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धेत तिने नवा विश्वविक्रम रचला.
जियाचा विक्रम आणखी एका कारणासाठी विशेष ठरतो. जिया ही आॉटिझम स्पेक्ट्रम डिसआर्डर या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार असलेल्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जियाने ३६6 किलोमीटरचे अंतर ८ तास ४० मिनीटांत पार केले, हे विशेष. पहाटे ३.५० ला जियाने पोहायला सुरुवात केली आणि दुपारी १२ वाजून ३० मिनीटांनी तिने तिचे लक्ष्य पूर्ण केले.