गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 ऑगस्ट 2018 (09:12 IST)

एनडीएला मोठा दिलासा, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी होणाऱ्या निवडणूकीत शिवसेनेने एनडीएचे उमेदवार हरिवंश यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएला मोठा दिलासा मिळाला आहे.
 
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी देण्यात आली आहे.भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून हरिवंश यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या अकाली दलचे नरेश गुजराल यांना उमेदवारी देण्याचं कबूल करण्यात आलं होतं. पण ऐनवळी उमेदवार बदलण्यात आला. त्यामुळे अकाली दलाच्या खासदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पण त्याचबरोबर हरिवंश यांना पाठिंबा देण्याचंही कबूल केलं आहे.