शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (11:33 IST)

व्हॅलेंटाईन डेला बाबू-शोना करताना दिसले, तर फटकवणार शिवसेना

फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा महिना आहे तर प्रेमीयुगुले 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे मोठया थाटाने साजरा करतात दिसतात. पण आता व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या प्रेमी युगुलांना शिवसेनेने थेट इशाराच दिला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये प्रेमीयुगुलांना रोखण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.
 
भोपाळमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी या दिवसानिमित्त कालिका शक्ति पीठ मंदिरात लाठ्या काठ्यांची पूजा केली. इतकेच नव्हे घोषणाबाजी देखील केली- “भारतीय संस्कृती के सम्मान में, शिवसेना मैदान में”,“पार्क में कुछ करते दिखे बाबू-सोना, तो तोड देंगे शरीर का कोना-कोना”, अशी घोषणाबाजी करुन सेनेने प्रेमीयुगुलांना इशारा दिला आहे. 
 
व्हॅलेंटाईन डे हा पाश्चात्य संस्कृतीचा भाग असून आपला याला विरोध असल्याचं कार्यकर्त्यांनी प्रेमीयुगुंलांना इशारा दिला आहे. आज शिवसेनेचे कार्यकर्ते हातात लाठी घेऊन शहराच्या विविध भागात गस्त घालत आहे. प्रेमीयुगुल दिसल्यास त्यांचं लग्न लावून त्यांची वरात काढली जाईल, असंही या शिवसैनिकांनी सांगितलं आहे. शिवसैनिकांनी पब, रेस्टॉरंट, आणि हॉटेल चालकांनाही व्हॅलेंटाईन डे संदर्भात कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन न करण्याचं आवाहन केलं आहे.
 
व्हेलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या जळगावात हिंदूराष्ट्र सेनेकडून प्रेमीयुगुलांना इशारा देण्यात आला आहे. व्हॅलेंटाईन डे ही पाश्चात्य कूप्रथा असून शहरात जागोजागी  सेनेकडून रॅलीद्वारे तरुणांचं प्रबोधन केले जाणार आहेत.