शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2024 (16:53 IST)

धक्कादायक! बॉल समजून बॉम्ब पकडला, स्फोटात मुलाचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात पांडुआ येथे खेळताना मुलाने बॉल समजून बॉम्ब उचलला आणि त्यात झालेल्या स्फोटात 13 वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटात दोन मुलं जखमी झाले आहे. 
 
बंगालच्या हुगळी जिल्ह्यात पांडुआ नेताजी कॉलोनीत काही मुले खेळत असताना बॉल समजून बॉम्ब हातात घेतला आणि बॉम्ब मध्ये स्फोट होऊन एका मुलाचा मृत्यू झाला.तर दोघे जण जखमी झाले. 

घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ते तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि मुलांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी राज विश्वास याला मृत घोषित केले. तर एका मुलाने आपला हात गमावला. इयत्ता सहावीच्या विद्यार्थी राज विश्वास हा रुपम बल्लभ आणि सौरव चौधरी सोबत घराच्या मागील बाजूस असलेल्या तलावा जवळ
सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास  खेळत असताना त्याने बॉल समजून चुकीने बॉम्ब उचलला आणि त्यात स्फोट होऊन त्याचा मृत्यू झाला.
 
या प्रकरणी पालकांकडून दोन व्यक्तींविरुद्ध तक्रार पोलिसांना मिळाली असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्याचा शोध पोलीस घेत आहे. ही स्फोटक कुठून आणि कशी आली याचा शोध पोलीस घेत आहे.  
बॉम्बस्फोटानंतर सदर परिसर हादरला असून हुगळीत हा बॉम्बस्फोट अशा वेळी झाला आहे जेव्हा इथे 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. बॉम्बस्फोटाच्या भीतीमुळे लोक घरात लपून बसले आहे. 
 
Edited By- Priya Dixit