1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 7 मे 2024 (16:21 IST)

19 वर्षानंतर सासरी आलेल्या जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

murder
उत्तर प्रदेश मधील बरेली गावात एक भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या मेहुण्यांची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. सांगितले जात आहे की, 19 वर्षांपूर्वी आरोपीच्या बहिणेने प्रेम विवाह केला होता. त्यामुळे तिचा भाऊ नाराज होता. 19 वर्ष राग डोक्यात ठेऊन अखेरीस त्याने हत्या केली.   
 
उत्तर प्रदेशमधील बरेली गावामध्ये आपल्या सख्य्या बहिणीच्या नवऱ्यालाच राग डोक्यात ठेऊन एका व्यक्तीने मृत्यू दिला. 19 वर्षानंतर महिला आपल्या घरी बरेली येथे माहेरी आली होती. तर जावाई आपल्या आजारी सासूला पाहण्यासाठी सासरी आला होता. तेव्हा क्षणाचा विलंब न करीत या आरोपीने आपल्या मेहुण्याच्या पोटात सुरा खुपसला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला हे भयानक कृत्य करून आरोपी फरार झाला आहे. पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली गेली असून पोलीस फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहे.