विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह
रक्षा मंत्री राजनाथ सिंह लखनऊ मध्ये म्हणाले की, भारत कुठल्याही देशावर आक्रमण करणार नाही तर विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल. ते म्हणाले की 2047 पर्यंत भारत विकसित देशच नाही तर एक सुपर पॉवर बनेल.
रक्षा मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित देशच नाही तर महाशक्ती बनवाचये आहे. महाशक्ती कोणत्याही देशावर आक्रमण नाही किंवा कोणत्याही देशावर कब्जा नाही तर, विश्व कल्याणासाठी बनवायचे आहे. रक्षा मंत्री सोमवारी निराळा नगर मधील माधव सभागार मध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या स्मृतीबद्दल आयोजित समरस्ता संमेलनाला संबोधित करीत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, जगामध्ये भारताचे नाव खूप मोठे झाले आहे. पहिले विश्व-मंचावर भारताचे म्हणणे गंभीरतेने घेतले जात न्हवते. पण आज आंतराष्ट्रीय स्तरावर भारत काही बोलतो तर जग कां येऊन ऐकते की, भारत काय बोलत आहे.
रक्षामंत्री म्हणाले की, 2014 पूर्वी अर्थव्यवस्था बद्दल भारत जगामध्ये 11 व्या स्थानावर होता. पण पीएम मोदींच्या नेतृत्वामध्ये भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या स्थानावर पोहचली आहे. भारत ज्या गतीने विकास करीत आहे. ते पाहता वर्ष 2047 मध्ये भारत विश्वाची तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल.
भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत रक्षामंत्री म्हणाले की, स्वतंत्र भारतामध्ये सर्व सरकारने देशांमधून गरिबी समाप्त करण्याचा चर्चा केली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशातून 25 करोड लोक दारिद्ररेषेखालून वरती आले आहे. तसेच रक्षा मंत्री म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारत देश बनवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. स्वतंत्रतेनंतर सरदार पटेल यांनी देशातील सर्व रियासतींना एक करण्याचे काम केले होते. तसेच ते म्हणाले की, वर्ष 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. सर्वात आधी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात उंच प्रतिमा बनवण्याचा संकल्प केला. यानंतर प्रत्येक गावातील शेतकऱ्याने लोखंडाचा एक एक तुकडा जमवला. त्यानंतर युनिटी ऑफ स्टॅच्यू बनवला गेला.
Edited By- Dhanashri Naik