गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2024 (09:53 IST)

तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा उत्साह, पीएम मोदींनी केले मतदान

narendra modi
लोकसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्या टप्प्यात ११ राज्यांमध्ये ९४ जागांसाठी सकाळी ७ वाजता मतदान सुरु झाले. सात केंद्रीय मंत्रींनी आणि चार पूर्व मुख्यमंत्रीनी तसेच अनेक मोठ्या व्यक्तींनी मतदान केले. 
 
गृहमंत्री अमित शहा आणि त्यांची पत्नी सोनाला शाह यांनी गांधीनगर मध्ये मतदानाचा हक्क बजावला. तसेच शरद पवार यांनी बारामतीमध्ये मतदान केले. पश्चिम बंगाल मध्ये मुर्शिदाबादमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपसात भिडले. 
 
तसेच सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. तसेच पीएम मोदींचे भाऊ सोमाभाई यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मत दिल्यानंतर पीएम मोदींनी लोकांना आहवाहन केले की सर्वानी मतदान करा. तसेच जेव्हा पीएम मोदी मतदान करण्यासाठी गेलेत तेव्हा अमित शहा यांनी त्यांचे स्वागत केले. दोघांनी सोबत मतदान केले. कर्नाटकचे पूर्व मुख्यमंत्री  बीएस येदियुरप्पा यांनी देखील मतदान केले. गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी नवसरीमध्ये मतदान केले. 
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मध्यप्रदेश भाजप अध्यक्ष विडी शर्मा यांनी देखील केले मतदान. या टप्प्यात जय जागांवर निवडणूक होतील त्यामध्ये गुजरातची २५, कर्नाटकची १४, महाराष्ट्राची ११, उत्तरप्रदेशची १०, मध्यप्रदेशची ९, छत्तीसगडची ७, बिहारची ५, पश्चिमबंगालची आणि आसामची ४, गोवा २, ह्या जागा सहभागी आहे. 
 
८.३९ कोटी महिलांसोबत कमीतकमी १७.२४ लोक मतदान करण्यासाठी पात्र राहतील. १.८५ लाख मतदान केंद्रांवर १८.५ लाख लोक ठेवले आहेत. या टप्प्यात भाजपचे सर्व काही दाव वर  आहे मागील निवडणुकीत गुजरात , कर्नाटक, बिहार, मध्यप्रदेश इतर अन्य राज्यांनी देखील यश मिळवले होते.